केस कोरडे आणि निर्जीव होण्याची बरीच कारणे आहेत- उन्हात बराच वेळ घालवणे, कोणते पाणी वापरेल जाते आणि अयोग्य आहार देखील. तुम्हाला कोरड्या केसांची समस्या असल्यास पूढील टिप्स करून पहा...

१. उष्णता वापरून केस कोरडे करू नका.

२. केसांना मोईस्चराईझ करा.

३. केसांना आहार द्या
shampoo for dry hair dove dryness care img

योग्य प्रॉडक्ट वापरा

कोरड्या केसांसाठी, त्यांना मॉइस्चराईझ करेल असा शाम्पू वापरावा. आम्ही शिफारस करु डव्ह ऑक्सिजन मोईस्चर शॅम्पू आणि कंडिश्नर ने केस धुण्याची. त्यात आहे (ओक्सी फ्युजन टेक्नॉलॉजी) Oxyfusion Technology जे केसांना ओलावा देते आणि कालांतराने केसांना दाट बनवते.

केस पूर्णपणे कोरडे करा

केस धुवून कंडिशन करुन झाले की ते हवेनेच वाळवायचा प्रयत्न करावा ड्रायर्स आणि स्ट्रेटनर्सचा वापर टाळावा. ओले केस वाळवताना,
टॉवेलने खसखस पुसू नयेत. अंघोळ झाल्यावर लगेच मऊ टी शर्टमध्ये गुंडाळावेत ज्यामुळे केसांचा ओलावा कमी न होता कॉटन पाणी शोषून घेईल.

योग्य आहार घ्या

केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स तुमच्या केसांना निरोगी ठेवतात. ते मासे, अळशी, तुळस आणि अंबाडी दाण्यांमध्ये आढळते.

गरम पाण्याने अंघोळ टाळा

कोरड्या केसांसाठी सर्वात पहिली सूचना म्हणजे गरम पाणी टाळावे. त्यामुळे केसांचे नुकसान होते, केसातील ओलावा नष्ट होतो, ज्यामुळे केस कोरडे बनतात. म्हणूनच केस कोमट पाण्याने धुवावेत.