तेलकट त्वचेची समस्या हाताळणे कठीण असते. तुमची त्वचा - तुमचे कपाळ, नाक आणि हनुवटी या ठिकाणी चमकदार दिसते, चिकट वाटते आणि तुम्हांला अनेकदा ब्लॅकहेड आणि मुरमांच्या समस्येला सामोरे जावे लागते. तेलकट त्वचा हाताळणे जरी सोपे नसले, तरी खात्रीने ते अशक्य नाही. तेलकट त्वचेसाठी घ्यावयाच्या निगेविषयी खरेच तुम्हाला जाणण्याची इच्छा असेल तर स्वत:ला खालील प्रश्न विचारा...
 

तुमचा क्लिंजर तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य आहे का?

तुमचा क्लिंजर तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य आहे का?

त्वचेची निगा राखण्याच्या पथ्यामध्ये क्लिंजिंग करणे हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जेव्हा तुम्ही तेलकट त्वचेशी लढत असता, तेव्हा जेल-आधारित फेस वॉशवर अवलंबून राहणे ही एक सर्वोत्तम गोष्ट असते, कारण बर्याचदा तेलकट त्वचेची जळजळ होत असते आणि जेलयुक्त फेस वॉश त्वचेला शांत करतो. आम्ही तुम्हाला पॉन्ड्स व्हाइट ब्युटी पर्ल क्लिंजिंग जेल फेस वॉशचा वापर करण्याचा सल्ला देतो. हे क्लिंजर पर्ल इसेंन्सयुक्त आहे आणि ते तुमच्या त्वचेला चमकदार बनवते . याचा ऑक्सिजेनेटेड जेल फॉर्म्युला आतून घाण आणि अतिरिक्त तेल काढून तर टाकतोच आणि त्याच वेळी त्वचेला टवटवीत आणि स्वच्छ करतो- हे तेलकट त्वचेसाठी अत्यंत आवश्यक असते.

 

तुम्ही मॉइश्चरायजरचा वापर टाळत आहात का?

तुम्ही मॉइश्चरायजरचा वापर टाळत आहात का?

तेलकट त्वचा असलेल्या आपल्यापैकी अनेक जणांना मॉइश्चरायजर त्वचेला तेलकट बनवतात असे वाटते पण वास्तवात मॉइश्चरायजरचा वापर न केल्याने तुमच्या त्वचेला अधिक हानी होत असते. जर तुम्ही तुमच्या त्वचेला पुरेशा प्रमाणात मॉइश्चराइज केले नाही तर ते त्वचेच्या पोषणासाठी अधिक तेल उत्पादीत करते त्यामुळे तुमची त्वचा आणखी तेलकट दिसते. त्यामुळेच तुम्ही तुमच्या त्वचा प्रकारासाठी योग्य मॉइश्चरायजर निवडणे आवश्यक असते. तुम्ही लॅकमे पिच मिल्क मॉइश्चरायजरचा वापर करावा असे आम्हांला वाटते. आरोग्यकारक पिचेसच्या मिलापाने समृद्ध असे हे जादुई उत्पादन त्वचेला तेलकट केल्याशिवाय तिचे आतून पोषण करते.

 

तुमच्या लोशनमध्ये योग्य घटक आहेत का?

तुमच्या लोशनमध्ये योग्य घटक आहेत का?

जेव्हा तुमची त्वचा तेलकट असते, तेव्हा तुमच्या शरीरावर कोणतीही अतिरिक्त लोशन्स लावल्यास ती तुमच्या त्वचेला आणखी चिकट बनवतील असे तुम्हांला वाटते. यावर उपाय म्हणजे योग्य घटकांनी युक्त असलेले, तुमच्या त्वचेला पोषण देणारे आणि अत्यंत हलके वाटणारे लोशन निवडणे. त्यामुळेच तुम्ही व्हॅसलिन इंटेसिव्ह केअर ॲलो सूद बॉडी लोशनची निवड करावी. या उत्पादनामध्ये शुद्ध कोरफडीचे गुण आहेत. हे लोशन तुमच्या त्वचेवर पिसाप्रमाणे पसरून अत्यंत अलगद रित्या त्वचेला शांत करतात आणि तिला आतून मॉइश्चराइज करतात.